शुभेच्छा

  युवा मंत्रा  
     
 
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे पुणे केंद्र गेली अनेक वर्षे उत्तम रीतीने कार्य करत आहे.समाजातील सर्व वयोगटाच्या लोकांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न्न असतो. त्याच हेतूने केंद्राचे प्रमुख श्री. प्रकाश दाते आणि इतर पदाधिकाऱ्याच्या पुढाकाराने ११ वर्षांपूर्वी ब्राह्मण युवक युवतीसाठी एक हक्काचं व्यासपीठ आकाराला आलं ----युवा मंत्राच्या रूपाने !

काळ झपाट्याने बदलतो आहे.जग जवळ येत चालले आहे. बदलाच्या या वेगाशी जुळवून घेताना आपले युवक कुठही कमी पडू नयेत यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, हे ओळखून संस्थेने युवकांसाठी युवा मंत्राची स्थापना केली. आज युवकांपुढे आदर्श ठरतील अशा व्यक्ती अभावानेच आढळतात. म्हणूनच युवकांना संघटीत करून त्यांच्या कला गुणांना वाव द्यावा, त्यांना कर्तुत्वाची साधी उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने युवा मंत्राची धोरणे ठरवण्यात आली.
 
हे ब्रीद ठरवून युवकांना संघटीत करण्याचं काम जोमाने सुरु झालं.अनेक समविचारी युवक युवती एकत्र येत गेले आणि त्यांच्या नवनवीन कल्पना युवा मंत्रा च्या माध्यमातून साकारत गेल्या. आपल्या अनुभवाची शिदोरी ज्येष्ठ सभासदांनी उदार मनाने युवकांसाठी खुली केली . त्यांच्या सशक्त मार्गदर्शनामुळेच गेली ११ वर्ष युवा मंत्रा यशस्वीरित्या वाटचाल करत आहे.
युवकांनी एकत्रितपणे काम करून स्वतः च्या जीवनात प्रगती करावी आणि त्याच बरोबर समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न्न करावा यासाठी युवा मंत्राने व्यापक उद्देश योजून काम सुरु केले.
 
COME WITH US AND WE SHALL SHAKE THE WORLD
 
उद्देश :
 
सर्व ब्राह्मण ज्ञातीतील युवक युवतीचे संघटन करणे.
ब्राह्मण युवक युवतींसाठी हक्काचं व्यासपीठ तयार करणे.
नोकरी देवाण घेवाण केंद्र ( इम्प्लोयमेंट एक्स्चेंज ) सुरु करणे.
युवा शक्तीला विधायक वळण देऊन सामाजिक जाणीवा जागृत करणे.
समाजातील मान्यवर आणि कार्यरत व्यक्तीशी त्यांची भेट घडवून आणणे,त्यांच्या कडून मार्गदर्शन मिळवून देणे.
 
या उद्देश पूर्तीसाठी आजच्या स्पर्धात्मक युगाचा विचार करून आपल्या युवकांसाठी युवा मंत्रा वेगवेगळे उपक्रम राबवते. आपल्या बुद्धीजीवी वर्गाचा नेहमी चाकोरी बद्ध वाटेने जाण्याकडे कल असतो. चाकोरी सोडून वेगळा विचार त्यांनी करावा ,प्रवाह विरुद्ध पोहण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमात वैविध्य साधलं जातं.
 
उपक्रम :
 
दर वर्षी युवा मंत्रा चा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतो. युवा आणि बाल कलाकार, खेळाडू, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवकाना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. त्यांच्यासाठी ही कौतुकाची थाप असते आणि इतरांना प्रेरणादायी असते.
निरनिराळ्या स्पर्धा, मेळावे घेऊन संघटन कार्य साधले जाते.
कोजागिरी पौर्णिमा, संक्रांत, बहर मैत्रीचा अशा निमित्ताने युवकांच्या कला गुणांचे सादरीकरण करून त्यांना रंगमंच उपलब्ध करून दिला जातो.
व्याख्यानमाला, चर्चासत्र आणि परिसंवाद आयोजित करून युवकांना स्वतःचे विचार मांडण्याची, कल्पनांची देवाण घेवाण करण्याची संधी दिली जाते.
क्षमता असूनही कित्येक मुलांना नोकरी मिळत नाही, अशा युवकांनी उद्योग जगतात भरारी घेऊन स्वतः रोजगार निर्माण करावे यासाठी उद्योजकता मेळावा भरवण्यात येतो.
नोकरी देवाण घेवाण केंद्र मार्फत योग्य नोकरीसाठी माहिती दिली जाते.
समाजाचे ऋण फेडता यावे, सामाजिक प्रश्नाकडे मुलांनी डोळस वृतीने पाहावं यासाठी सामाजिक उपक्रम घेतले जातात. यामध्ये निरनिराळ्या सामाजिक संस्थाना  सेवाभावी संस्थाना भेटी देणे, विशेष मुले किंवा अपंग सैनिक यांच्या बरोबर सण साजरे करणे, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता फेरी असे विविध कार्यक्रम घेतले जातात.
 
परंपरा न सोडता नवनव्या विचार प्रवाहांना बरोबर घेऊन जाणारी युवा पिढी निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

युवा पिढी हीच समाजाचा खरा आधार स्तंभ आहे डॉ. ए .पी. जे अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत उभा करायचा असेल तर युवा पिढीला शारीरिक आणि बौद्धिकदृष्टया सशक्त करायला हवे. युवकानी डोळसपणे भोवताली बघितलं तर त्यांचा दृष्टीकोन विशाल होईल. त्यांना बुद्धी बरोबरच श्रमाचं महत्त्व समजलं तर समाजाची पर्यायाने राष्ट्राची उन्नती होईल. यासाठी संकुचित मनोवृत्ती सोडून युवकांनी मैत्र भाव जपणे गरजेचे आहे. म्हणूनच युवा मंत्रा चे सर्व कार्यकर्ते झटून कार्य करत असतात. आपणही आपल्या नवनव्या कल्पना आणि विचार घेऊन युवा मंत्राच्या साथीने वाटचाल सुरु करूया. एकदिलाने हातात हात घेऊन पुढे पुढे जाऊया.
युवा मंत्रा चे सभासद होण्यासाठी फक्त दोन पावले पुढे टाका.
 
 
युवा मंत्राचे शिल्पकार :
 
१.
कै. श्रीकांत देव - संस्थापक - अध्यक्ष
 
२. श्री. निखील दांडेकर
३. मायली गोडबोले
४. श्री. अतुल वैद्य
५. श्री. पवन कुलकर्णी - विद्यमान अध्यक्ष