शुभेच्छा

  शैक्षणिक योजना  
     
 
शैक्षणिक आर्थिक सहाय्य
 
संस्थेतर्फे सुरू असलेल्या महत्वाच्या योजनेमधील शैक्षणिक स्तंभ योजनाही सध्याच्या खर्चिक शैक्षणिक पध्दतीत अत्यंत आवश्यक व प्रत्येक सधन व्यक्तीने गांभीर्याने विचार करावा अशी योजना आहे. सन २००४ पासून ही योजना राबविण्यास सुरूवात झाली. प्रथम वर्षी अत्यंत गरीब व गरजू अशा दोन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले गेले व पहाता पहाता सन २०१३ पर्यंत सुमारे ३५/४० विद्यार्थी /विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेत असून रू.१.५० लाख रूपयांचे वाटप करण्यात येत आहे. अर्थातच ही योजना इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी करणेसाठी समाजातील दानशुर व्यक्ती मोलाचे आर्थिक सहाय्य करीत आहेत.

असे असले तरी अजून बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी /विद्यार्थिनी हे शिक्षणापासून केवळ आर्थिक पाठबळ नसल्या कारणाने वंचित रहात आहेत ही नक्कीच ब्राह्मण ज्ञातींसाठी खेदाची बाब आहे. प्रत्येक विद्यार्थी हा उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन समाजासाठी आदर्श घडावा ही मनोमन आमची व आपली पण नक्कीच इच्छा असेल. तरी आपणास विनंती की या शैक्षणिक आर्थिक योजनेसाठी सढळ हाताने आपण देणगी द्यावी व मोलाचा हातभार लावावा.
 
शैक्षणिक दत्तक योजना लाभ घेतलेले विद्यार्थी /विद्यार्थिनी
 
सुरूवात :- सन २००४ रू. ५,०००/- वाटप २ विद्यार्थी
  सन २००५ रू. १२,०००/- वाटप ४ विद्यार्थी
  सन २०११ रू. १,२५,०००/- वाटप ३० विद्यार्थी
  सन २०१२ रू. १,४०,०००/- वाटप ३५ विद्यार्थी
  सन २०१३ रू. १,५०,०००/- वाटप ३७ विद्यार्थी
उद्दिष्ट :- सन २०१५ रू. २ लाख वाटप ५० विद्यार्थी
 
तरी या योजनेस आपण सढळ हाताने भरघोस देणगी देऊन सहाय्य करावे.