शुभेच्छा

  जेष्ठ नागरीक संघ व विरंगुळा केंद्र  
     
 
१५ ऑगस्ट २०१२ पासून संस्थेने ज्येष्ठ नागरिक संघाची सुरवात केली. त्यामुळे संघ अद्याप बाल्यावस्थेत असला तरी सभासदांच्या सहकार्याने तो लवकरच सर्वांगांनी चांगलाच बहरेल अशी खात्री आहे. संघासाठी संस्थेने १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर असे वर्ष धरण्याचे ठरविलेले आहे. पहिल्या वर्षी संघासाठी कोणतीही वर्गणी आकारण्यात आलेली नव्हती. या वर्षी मात्र वार्षिक वर्गणी म्हणून रू. ३००/- घेण्यात आलेले आहेत. गेल्या २ वर्षात झालेल्या वेगवेगळया कार्यक्रमात खालील कार्यक्रम उल्लेखनीय ठरतील.
 
वर्ष १ ले :- (२०१२-१३)
 
१) मर्यादित सभासदांची भगूर येथील स्वा.सावरकरांच्या राष्ट्नीय स्मारकास भेट देण्यासाठी नेलेली सहल.
२) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व शिक्षक दिनानिमित्त मेळावा. यात नव्वदी पार केलेल्या ज्येष्ठांचा सत्कार व शिक्षक पुरस्कार असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.
३) कर्जत जवळील योगेश्वरी व व्याडेश्वर अशा जोड मंदिरास भेट देण्यासाठी काढलेली वर्षा सहल येताना श्री गगनगिरी महाराजांच्या खोपोली येथील समाधी मंदिरास दिलेली भेट. सुमारे ४० जणांचा सहभाग.
४) संघाचा वर्धापनदिन व शिक्षक दिनानिमित्त मेळावा. यात शिक्षक पुरस्कार व श्री.रमेश रावेतकर यांचे गायन असा कार्यक्रम झाला.
 
वर्ष २ रे :- (२०१३-१४)
 
१) ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मेळावा. यात सभासदांपैकी सर्वश्री श्रीधर रानडे व सुभाष पाटणकर यांनी अनुक्रमे कुंदन सैगल व महंमद रफी यांची गाणी सादर केली.
२) कै. डॉ. सौ. आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचे १५० वे जयंती वर्ष. (३१ मार्च २०१४ ते ३१ मार्च २०१५). त्यानिमित्त मुंबईच्या डॉ. सौ. वसुधाताई आपटे यांचे `आनंदीबाई जीवन चरित्र' या विषयावर व्याख्यान ठेवले होते. आनंदीबाई हिंदुस्थानच्या पहिल्या महिल्या डॉक्टर पण विस्मृतीत गेलेले एक थोर व्यक्तिमत्व. त्यामुळे व्याख्यानासाठी श्रोते कुतुहलापोटी आले होते व व्याख्यानानंतर तृप्त भावनेने परतले. कारण सौ.वसुधाताइंर्नी अतिशय ओघवती भाषेत, समोर कागद न ठेवता, आनंदीबाइंर्चा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. त्यातच भारत इतिहास संकलन समितीने उपलब्ध करून दिलेल्या मोठ्या आकाराच्या फोटोफ्रेमचे छोटेखानी प्रदर्शन मांडल्याने श्रोत्यांच्या आनंदात भरच पडली. व्याख्यानाला मिळालेल्या प्रतिसादामुळे दरवर्षी अशाच एखाद्या विस्मरणात गेलेल्या थोर व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्याचा मानस आहे.