शुभेच्छा

  अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या संकेत स्थळावर आपले स्वागत.  
     
 
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था ही समस्त ब्राह्मण समाज संघटित करण्याकरीता निर्माण झालेली एक शक्ती आहे. सर्व शाखीय ब्राह्मण समाजाने एका व्यासपीठावर यावे, आचार, रूढी, कुलाचार, व्रतवैकल्ये यामध्ये कालानुरूप बदल करून विज्ञाननिष्ठ पायावर ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण प्रगतीकरीता प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे. संघटीत ब्राह्मण हाच पाया आहे. तसेच या वाटचालीत आपण हिंदू समाजाचे एक बांधव आहोत हा विचार प्रामुख्याने पुढे ठेवला पाहिजे आणि याच हेतूने कै. शंकरराव तथा मामाराव दाते यांनी १९७२ साली समस्त ब्राह्मण समाज संघटित करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन केली.

मध्यवर्ती कार्यालय नाशिक येथे असून पुणे, जुन्नर, फलटण, मुंबई, ठाणे, शिरूर, नीरा येथे केंद्र (शाखा) आहेत.

ब्राह्मण ज्ञाती बरोबरच इतर समाज बांधवांना एकत्र करून किंवा त्यांच्या कार्याचा गौरव करून संस्था एकसंधपणे गेली अनेक वर्षे यशस्वीपणे कार्य करीत आहे.